मुंबई : दुष्काळी भागाचा दौरा करण्याच्या निमित्तानं निघालेल्या पंकूताईंना आपला एक 'सेल्फी' इतकी खळबळ उडवून देऊ शकतो, याची कल्पनाही आली नसावी.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जल योजना आणि इतर सरकारी कामांची पहाणी करण्यासाठी लातूरच्या दौऱ्यावर असताना  राज्याच्या महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा यांना 'सेल्फी'चा मोह आवरता आला नाही... आणि त्यामुळे त्या नसत्या वादात ओढल्या गेल्या. 


ट्विटरवरून पंकूताईंनी शेअर केलेला हा त्यांचा सेल्फी थोड्याच वेळात सोशल वेबसाईटवर वायरल झाला... त्यावरूनच 'डीएनए'चे कार्टुनिस्ट मंजुल यांना एका कार्टुनची कल्पना सुचली.... मंजुल यांचं हेच कार्टुन सध्या सोशल वेबसाईटवर हिट ठरतंय. 


सौ. डीएनए (कार्टुनिस्ट : मंजुल)