मुंबई : नोटबंदीविरोधात आज विरोधकांनी भारत बंदची घोषणा दिली आहे. मोदी सरकारने घेतलेल्या अचानक नोटबंदीच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. नोटबंदीच्या मुद्द्यावर संसेदत देखील मोठा गोंधळ पाहायला मिळतोय. दोन्ही सभागृहांचं कामकाज अनेकदा तहकूब करण्यात आलं. मोदी सरकारतच्या या निर्णयाचं अनेकांकडून कौतूक होतंय तर काही जन याच्या विरोधात आहेत. भारत बंदला इतका प्रतिसाद मिळणार नाही हे स्पष्ट दिसतंय. यासंबंधितच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतांना दिसतोय. ज्यामध्ये भारत बंदचा विरोध करत दुकानदाराने एक फलत दुकानावर लावलं आहे.