तरुणाई झिंगलीय `पोकेमॉन गो`च्या नादात!
मोबाईल गेम सगळेच खेळतात. मात्र अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सध्या एका मोबाईल गेमनं सर्वांनाच वेड लावलंय. `पोकेमॉन गो` या व्हर्च्युअल आणि रिअॅलिटीची सांगड घालणारा हा गेम सगळेच ऑनलाईन रेकॉर्ड मोडणार असं दिसतंय.
मुंबई : मोबाईल गेम सगळेच खेळतात. मात्र अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सध्या एका मोबाईल गेमनं सर्वांनाच वेड लावलंय. 'पोकेमॉन गो' या व्हर्च्युअल आणि रिअॅलिटीची सांगड घालणारा हा गेम सगळेच ऑनलाईन रेकॉर्ड मोडणार असं दिसतंय.
आठ दिवसांत १० लाख युजर्स... साडेसात अब्ज डॉलर्सची मार्केट व्हॅल्यू... मोबाईल गेम्सच्या दुनियेतला नवा सुल्तान... पोकेमॉन गो... ६ जुलैच्या लॉन्चिंगनंतर लगेचच मोबाईल गेम्समध्ये पोकेमॉनची लाट... हा गेम खेळताना तुम्हाला खऱ्याखुऱ्या खेळाचा आनंद मिळतो, ही याची खासियत...
काय आहे 'पोकेमॉन गो'
- पोकेमॉन गो हा एक ऑगमेंटेड रियॅलिटी (AR) बेस्ड मोबाईल गेम आहे
- आयओएस आणि अँड्रॉईड मोबाईलवर हा गेम उपलब्ध आहे
- व्हॉट्सऍप आणि इन्स्टाग्रामलाही यानं मागे टाकलंय
- अँड्रॉईडवर सरासरी ४३ मिनिटं २३ सेकंद पोकेमॉन गो सुरू असतो
- तर व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामचा सरासरी वापर आहे ३० मिनिटं २७ सेकंद
एका अहवालानुसार अमेरिकेमध्ये लॉन्चिंगच्या २ दिवसांतच ५ टक्के अँड्रॉईड डिव्हाईसेसवर हा गेम डाऊनलोड झाला. पोकेमॉन गोच्या युजर्सची संख्या दररोज ३ टक्क्यांनी वाढतेय. यामध्ये सर्वात आघाडीवर असलेल्या ट्विटरच्या युजर्समध्ये दररोज ३.६ टक्क्यांनी वाढ होतेय.
का आहे या गेमची क्रेझ?
पोकेमॉन गो हा फ्री-टू-प्ले गेम १८ ते २५ वयोगटामध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. पोकेमॉन गोमध्ये तुम्हाला वास्तवातल्या जगात फिरून पोकेमॉनला पकडायचं असतं. या गेममध्ये अनेक लेव्हल आहेत. या लेव्हल पार करताना मजेशीर अनुभव येतात. जेव्हा तुम्ही वास्तवातल्या जगात बाहेर पडाल, तेव्हा तुम्हाला 'जीपीएस'वर पोकेमॉनच्या दिशेचा अंदाज मिळतो. तुम्ही जितके जास्त पोकेमॉन जमवाल, तेवढे या गेममध्ये पुढे जाता.
पण या पोकेमॉनला पकडणं सोपं आहे, असं वाटत असेल तर थांबा... कारण हा गेम काही तुम्ही एकट्यानं खेळण्याच नाही... तुमच्या आसपास असलेल्या आणखी एखाद्या खेळाडूलाही तुम्हाला मिळालेलीच पोकेमॉनची दिशा मिळेल... त्यामुळे त्याच्या आधी पोकेमॉनला पकडण्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावेच लागतील. आपल्या मोबाईलवरच प्रतिस्पर्ध्याशी झगडून तुम्हाला पोकेमॉन पकडावा लागेल... या लढाईत जो जिंकेल, त्याला पोकेमॉन मिळेल.
आता इतका धम्माल गेम डाऊनलोड करून बघावा असं तुम्हालाही वाटतंय ना... पण पोकेमॉन भारतात येण्यासाठी तुम्हाला थोडी वाट बघावी लागेल.