मुंबई: कोणत्याही गोष्टीसाठी सध्या आपण इंटरनेटचा वापर करतो, आणि इंटरनेटवरही आपल्याला या गोष्टींची बहुतेक वेळा समाधानकारक उत्तरं मिळतात. पण इंटरनेट वापरताना खास करुन ऑनलाईन शॉपिंग करताना व्हायरसमुळे तुमची गुप्त माहिती लिक व्हायची शक्यता असते. या धोक्यापासून काय काळजी घ्यायला पाहिजे त्यासाठीच्या या टिप्स पाहा. 


थर्ड पार्टी लिंकवर करु नका क्लिक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही साईट्स अशा असतात, ज्यावर दिलेल्या लिंकमुळे तुम्ही थर्ड पार्टी लिंक किंवा सॉफ्टवेअरवर री-डायरेक्ट होता. अशा साईट्स मालवेयरच्या माध्यमातून तुम्हाला अडचणीत आणू शकतं. 


फुकटातल्या भानगडीत पडू नका


फुकटामध्ये मिळणारे व्हिडिओ किंवा अन्य गोष्टींची हाव तुम्हाला धोक्यात आणू शकते. तसंच टोरंट्सवरून व्हिडिओ डाऊनलोडही करत जाऊ नका, कारण यामुळे तुमच्या कॉम्प्यूटरमध्ये व्हायरस जाऊ शकतो. 


वेबसाईटचा सोर्स तपासून घ्या


वेबसाईटचा सोर्स नेहमी तपासून घ्या, यामुळे वेबसाईटबाबतची माहिती समजायला तुम्हाला मदत होईल. जर वेबसाईट ऑफिशिअल नसेल तर तिथून व्हिडिओ डाऊनलोड करु नका. 


वैयक्तिक माहिती जपून द्या


कोणत्याही वेबसाईटवर आपली वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स टाकताना दहा वेळा विचार करा. कारण तुम्ही दिलेल्या या माहितीचा दुरुपयोग व्हायची शक्यता आहे. 


जाहिरातींवर अंधविश्वास ठेवू नका


इंटरनेटवर येणाऱ्या जाहिरातींवर अंधविश्वास ठेवू नका. ऑनलाईन शॉपिंगवेळी दिसणाऱ्या जाहिराती तुम्हाला फसवू शकतात. यावर वैयक्तिक माहिती शेअर करु नका. 


प्रत्येक वेळी पासवर्डचा वापर करा


मोबाईल किंवा कॉम्प्यूटर, लॅपटॉपसाठी नेहमी पासर्वड ठेवा. कारण याची चोरी झाली तरी तुमचा पर्सनल डेटाचं नुकसान होणार नाही. 


फोनवर नेहमी ठेवा अँटी व्हायरस


तुमच्या मोबाईल, कॉम्प्यूटर आणि लॅपटॉपमध्ये नेहमी अंटी व्हायरस ठेवत जा. यामुळे इंटरनेट वापरताना येणाऱ्या व्हायरसपासून तुमचा मोबाईल, कॉम्प्यूटर, लॅपटॉप सुरक्षित राहिल. 


सुरक्षित सर्च टूलचा वापर करा


इंटरनेटवर कंटेट सर्च करताना नेहमी सेफ सर्च टूलचा वापर करा. यासाठी मॅकेफीचं कॉम्प्लिमेंट्री व्हर्जन इन्स्टॉल करा.


सार्वजनिक वायफायचा वापर टाळा


सार्वजनिक ठिकाणी फुकटात मिळणाऱ्या वायफायचा वापर शक्यतो टाळा. या ठिकाणी तुमच्या मोबाईलमधला पर्सनल डेटा आणि बँक डिटेल्सही हॅक होऊ शकतात. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना किंवा बँकांचे व्यवहार करताना सार्वजनिक वायफाय वापरू नका. 


समजदार असण्याची गरज


इंटरनेट वापरताना समजदार असण्याची गरज आहे. समोर दिसणाऱ्या लिंकबाबतचं सत्य कळणं आणि त्यावर पर्सनल डेटा शेअर करणं योग्य की अयोग्य हे समजणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला खात्री असेल तरच वैयक्तिक माहिती शेअर करा.