नवी दिल्ली : मुलींची छेड काढल्याच्या घटना समाजात सर्रास घडत असतात. अनेकदा याच्याविरोधात आवाज उठवला जातो. मात्र बऱ्याचदा भितीने अशा घटनांकडे दुर्लक्ष केले जाते. दुर्लक्ष केल्याने ही घटना काही थांबत नाही मात्र तसेच करणाऱ्यांना उलट अधिक चेव येतो. वेळीस अशा घटनांविरोधात आवाज उठवला गेला तर काही प्रमाणात आळा बसू शकतो. या व्हिडीओत हाच संदेश देण्यात आला आहे. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक प्रोफेसर मुलीची संपूर्ण वर्गासमोर छेड काढतो. यावेळी त्या मुलीने आवाज उठवला असता धमकी देऊन तो हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्यावेळी सर्व विद्यार्थ्यी त्या मुलीच्या बाजूने उभे राहतात.