मुंबई : जगातील लोकप्रिय मेसेजिंग सर्व्हिस व्हॉटस अॅपने आपल्या युझर्ससाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. व्हॉटसअॅपवरील तुमचे मेसेज आता कुणीही हॅक करू शकणार नाही, किंवा कोणतीही संस्था ते पाहू शकत नाही, एवढंच काय तर संबंधित देशातील सरकारही ते उघडू शकत नाही.


दोन व्यक्तीच मेसेज पाहू शकतात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे मेसेज फक्त दोनच व्यक्ती आता पाहू शकतात, एक मेसेज पाठवणारा आणि ज्याला मेसेज पाठवला आहे ती व्यक्ती.


युझर्सची प्रायव्हसी महत्वाची


आतापर्यंत व्हॉटसअॅप मेसेज सुरक्षा एजन्सीज पासून हॅकरपासून कुणीही इंटरसेप्ट करू शकत होतं, पण आता मेसेजमध्ये असा कोड लावण्यात येईल, ज्यामुळे कुणीही वाचू शकणार नाही.


आता सर्व काही सुरक्षित


व्हॉटस अॅपने युझर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. व्हॉटस अॅपच्या सर्वात अपडेट वर्जनने कॉल मेसेज, फोटो, व्हिडीओ, फाईल, ऑडीओ सर्व काही या कोडने सुरक्षित करण्यात आलं आहे.