तुम्ही कोणत्या मोबाईल कंपनीचा टेरिफ प्लान निवडताय?
जिओच्या प्राईम मेम्बरशीपसाठी रजिस्ट्रेशन 1 मार्चपासून सुरू झालं. सोबत आता जिओच्या सुविधा फ्री राहिलेल्या नाहीत.
मुंबई : जिओच्या प्राईम मेम्बरशीपसाठी रजिस्ट्रेशन 1 मार्चपासून सुरू झालं. सोबत आता जिओच्या सुविधा फ्री राहिलेल्या नाहीत.
कंपनीनं आपल्या युझर्सनं कायम ठेवण्यासाठी नवे टेरिफ प्लान जाहीर केलेत. इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत हे टेरिफ प्लान स्वस्त असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.
याच दरम्यान, एअरटेलनं मंगळवारी टेरिफ प्लान जाहीर केलेत. यामध्ये 145 रुपयांमध्ये कंपनीनं 14 जीबी डाटा देणारा प्लान जाहीर केलाय.
तुमच्या सुविधेसाठी आम्ही जिओ - एअरटेल - व्होडाफोन - आयडिया या कंपन्यांनी जाहीर केलेल्या टेरिफ प्लानची तुलना तुमच्यासमोर मांडतोय. त्यामुळे, तुम्हाला मोबाईल नेटवर्क निवडण्यासाठी मदत होऊ शकेल.
जिओ
किंमत - 303 रुपये
डाटा - 30 जीबी (फोर जी)
कॉल - फ्री STD / लोकल कॉल
व्हॅलिडिटी - 30 दिवस
एअरटेल
किंमत - 145 रुपये
डाटा - 14 जीबी
कॉल - फ्री STD / लोकल कॉल (एअरटेल-टू-एअरटेल)
व्हॅलिडिटी - 30 दिवस
व्होडाफोन
किंमत - 349 रुपये
डाटा - 1 जीबी (फोर जी)
कॉल - फ्री STD / लोकल कॉल (कोणत्याही नेटवर्कवर)
व्हॅलिडिटी - 28 दिवस
आयडिया
किंमत - 348 रुपये
डाटा - 1 जीबी
कॉल - फ्री STD / लोकल कॉल
व्हॅलिडिटी - 28 दिवस