मुंबई : रिलायन्स जिओच्या 4G सेवेला सोमवार म्हणजेच उद्यापासून सुरुवात होणार आहे. आत्तापर्यंत रिलायन्स डिजीटल स्टोअर्समध्ये उपलब्ध असणारी रिलायन्स जिओची सीमकार्ड आता मोबाईलच्या दुकानांमध्येही मिळणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरातल्या दोन लाख दुकानांमध्ये आता रिलायन्स जिओची सीमकार्ड मिळणार आहेत. सुरवातीलाच रिलायन्स जिओचे 1.5 मिलियन ग्राहक झाले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये 100 मिलियन ग्राहक बनवण्याचं रिलायन्स जिओचं लक्ष्य आहे.