तुमच्याकडे असलेलं जिओ कार्ड प्री-पेड आणि की पोस्ट पेड?
रिलायन्स जिओ 4जी आपल्या प्री-पेड आणि पोस्ट पेड ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी दिलीय.
मुंबई : रिलायन्स जिओ 4जी आपल्या प्री-पेड आणि पोस्ट पेड ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी दिलीय.
रिलायन्स जिओच्या ज्या ग्राहकांनी तासनतास रांगेत उभं राहून फ्री कॉलिंग आणि इंटरनेटसाठी हे कार्ड मिळवले त्यांना आपलं कार्ड प्री-पेड आणि पोस्ट पेड हेदेखील ठाऊन नाही... कंपनीनंही ही माहिती ग्राहकांना दिली नाही.
कंपनीचा खुलासा...
याबद्दलच आता मात्र कंपनीनं खुलासा केलाय. फ्री कॉलिंग आणि इंटरनेटची सुविधा दोन्ही प्रकारच्या सिम कार्डमध्ये उपलब्ध होती. 31 मार्च 2017 पर्यंत या सगळ्या सुविधा मोफत असतील... तेव्हापर्यंत हे कार्ड प्री-पेड आणि की पोस्ट पेड याचा ग्राहकांना काहीही फरक पडणार नाही.
परंतु, 31 मार्च 2017 नंतर मात्र ग्राहक आपल्या वापरानुसार पोस्ट पेड किंवा प्री पेड कनेक्शन वापरू शकतील. कंपनीच्या म्हणण्यानुसार 31 मार्च 2017 नंतर कंपनी याची सुविधा उपलब्ध करून देईल.
ग्राहकांनो सावधान...
परंतु, याआधीच ग्राहकांना सावधान होणं गरजेचं आहे.... कारण कंपनीची मोफत ऑफर संपताच तुमच्या घरी बिल येऊ शकतं... आणि नियम-अटीनुसार तुम्हाला हे बिल भरावं लागू शकतं.