मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स जिओचे बिल सोशल मीडियावर व्हायरल होतंय. यात बिलाची रक्कम तब्बल 27,718 इतकी देण्यात आलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकातामधील अयुनूद्दीन मोंडल या व्यक्तीच्या नावाने हे बिलं दिसतंय. तसेच जमा कऱण्याची तारीख 20 नोव्हेंबर अशी आहे. तसेच वेळेत बिल न भरल्यास 1,100 रुपये ज्यादा पैसे आकारले जाणार असल्याचे म्हटलेय. 


इकॉनोमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, बिलावर देण्यात आलेला हा नंबर कोलकाता येथील आहे मात्र हा नंबर सध्या बंद आहे. दरम्यान 31 डिसेंबरपर्यंत जिओची सर्व्हिस फ्री आहे. त्यामुळे हे बिल फेक आहे. मात्र या बिलामुळे जिओ यूझर चांगलेच घाबरले होते. 


रिलायन्स जिओच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, हे बिल खोटे आहे. सध्या ग्राहकांना वेलकम ऑफर अंतर्गत 31 डिसेंबरपर्यंत फ्री व्हॉईस कॉल तसेच इंटरनेट सुविधा दिली जातेय.