सात रस्त्याला असलेलं सर्वात लाजवाब श्रीराम हॉटेल
या चौकात श्रीराम नावाचं व्हेज हॉटेल आहे. या हॉटेलात तुम्हाला मिळणारे सर्वच्या सर्व पदार्थ लाजवाब आहेत.
मुंबई : मुंबईत महालक्ष्मी स्टेशनच्या पूर्व बाजूला धोबी तलावच्या दिशेने खाली गेल्यानंतर, सात रस्त्याचा चौक लागतो, या चौकात श्रीराम नावाचं व्हेज हॉटेल आहे. या हॉटेलात तुम्हाला मिळणारे सर्वच्या सर्व पदार्थ लाजवाब आहेत.
सुरूवातीला दुग्धालय असलेलं हे व्हेज रेस्टॉरंट आता अप्रतिम खाद्यपदार्थ देतं, येथील प्रत्येक गोष्ट लाजवाब आहे. सात रस्त्याला आर्थर रोडला जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला उभं राहून विचारा श्रीराम हॉटेल कुठे आहे, कारण एका निमुळत्या अगदी दोन फूट गल्लीत १० फूट गेल्यावर हे भव्य दिव्य हॉटेल दिसतं.
या हॉटेलात सकाळचा नाश्ता पोहे, चहा, दुधापासून तर सायंकाळच्या समोसा, व्हेज बिर्याणी एवढंच नाही, मक्के दी रोटी, सरसो दा साग, पासून पापडी जिलेबी सर्व काही अप्रतिम मिळतं. एकदा तुम्ही या ठिकाणी जाऊन पाहा, खा तुम्ही या भागात गेले तर नेहमी येथे गेल्याशिवाय पुढे जाणार नाहीत.