मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकराच्या नावाने भारतात आज नवा स्मार्टफोन लाँच झाला आहे. `स्मार्टोन’  या कंपनीने हा नवा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन रमेश तेंडुलकर अर्थात `एसआरटी’ असे या स्मार्टफोनचे नाव आहे. 4 जीबी रॅम असलेल्या या स्मार्टफोनची किंमत 12,999 आणि 13,999 रुपये आहे. 32 जीबीचा 12,999 रुपये तर 64 जीबीचा 13,999 रुपये आहे. या फोनच्या मागे तेंडुलकरची स्वाक्षरीही असणार आहे. 


आपल्या नावाचा नवा स्मार्टफोन बाजारात येणार असल्याची माहिती खुद्द सचिनने दिली होती. ट्विटरच्या माध्यमातून त्याने ही माहिती दिली. यामध्ये 5.5 इंच डिस्प्ले, ग्लोरिला ग्लास 3 प्रोटेक्शन आहे. 625 ऑक्टोकोर प्रोसेरर आहे. हा अॅड्रॉईड 7.1.1वर चालणारा आहे.


तसेच यात डय़ूल सिम सपोर्ट असून 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल मेमरी आहे. यासोबतच 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. 3000 एमएएच बॅटरी क्षमता आहे. हा झटपट चार्ज होणारा मोबाईल असून 2.0 टेक्नॉलॉजी सपोर्ट करतो.



14,999 रुपयाच्या फोनची वर्षांची एक्स्ट्रा वॉरंटी असून 1500 रुपयांची सुट आहे. तसेच 599 रुपयांचे बॅक कव्हरही मोफत दिले जाणार आहे. तसेच हा फोन 1167 रुपयांवर महिना ईएमआयवर उपलब्ध आहे. फोन खरेदी करणाऱ्यांना 1,499 रुपयांची व्हॅल्यूची एक वर्षांची एक्सटेंडेड वॉरंटी देण्यात आली आहे.