सचिन तेंडुलकरला पडलं `मेक इन इंडिया`चं स्वप्न
मुंबई : क्रिकेट विश्वातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारताबद्दल एक स्वप्न पाहिलंय.
मुंबई : क्रिकेट विश्वातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारताबद्दल एक स्वप्न पाहिलंय. प्रत्येक अमेरिकन व्यक्तीच्या हातात भारतात तयार झालेला मोबाईल फोन असावा, अशी इच्छा सचिन तेंडुलकरने व्यक्त केली आहे. स्वदेशी कंपन्यांनी जागतिक दर्जाची उत्पादने तयार करावी, असे सचिनने म्हटले आहे.
गुरुवारी मुंबईत स्मार्टोन या स्वदेशी कंपनीच्या एका नोटबुकचे उद्घाटन करण्याच्या कार्यक्रमात बोलत होता. सचिननेही या कंपनीत गुंतवणूक केली आहे. आपल्या जीवनातील ही दुसरी इनिंग असल्याचं सचिनने याप्रसंगी म्हटलं. आपण जेव्हा या मोबाईलची मागील बाजू पाहू तेव्हा त्यावर तो भारतात तयार झाला आहे, असं लिहिलेलं असेल याचा मला अभिमान आहे, असं सचिन म्हणाला.
सचिन याच कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडरही आहे. पण, या कंपनीत त्याची किती टक्के गुंतवणूक आहे याविषयी मात्र त्याने काही सांगितलेलं नाही.