मुंबई: सॅमसंगनं आपले गॅलेक्सी S7(R)आणि गॅलेक्सी S7 एज  हे दोन स्मार्ट फोन लॉन्च केले आहेत. हे दोन्ही फोन 3 डी ग्लास आणि मेटलचे आहेत. गॅलेक्सी S7 या फोनची स्क्रीन 5.1 इंचाची आहे, तर S7 एजची स्क्रीन 5.5 इंचाची आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गॅलेक्सी S7 मध्ये 4 जीबीची रॅम, 12 मेगापिक्सलचा रेअर कॅमरा, 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनची इनबिल्ड मेमरी आहे 32 जीबी आहे, तर एसडी कार्डसाठीही वेगळा स्लॉट आहे. पूर्णपणे वॉटरप्रूफ असलेल्या या फोनची बॅटरी 3000 मेगाहर्टज आहे, तर या फोनसाठी वायरलेस चार्जिंगची सुविधाही देण्यात आली आहे. 


तर S7 एज मध्येही 4 जीबीची रॅम, 12 मेगापिक्सलचा रेअर, 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनची इनबिल्ड मेमरी 32 जीबी आहे, तर एसडी कार्डसाठी वेगळा स्लॉट आहे. गॅलेक्सी S7 प्रमाणेच हा फोनही वॉटरप्रूफ आहे, या फोनमध्येही वायरलेस चार्जिंगची सुविधा आहे. 


3600 मेगाहर्टजची बॅटरी आणि 5.5 इंचांची स्क्रीन यासारख्या काही गोष्टी सोडल्या तर या दोन्ही फोनमध्ये फारसा फरक नाही. 


11 मार्च 2016 पासून हे फोन मार्केटमध्ये येणार आहेत, पण भारतामध्ये हे फोन कधी लॉन्च होणार याबाबत मात्र अजून कंपनीनं कोणतीही घोषणा केली नाही. या दोन्ही फोनच्या किंमतीबाबतही सॅमसंगनं अजून काहीच सांगितलं नाही.