मुंबई : बुधवारी २५ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होतोय. या निकालानंतर पुढे काय? पुढच्या शिक्षणासाठी पैशांची व्यवस्था कशी करणार? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलांनो सध्या तुमच्यासाठी अनेक स्कॉलरशीप उपलब्ध आहेत. कम्प्युटरवर तुम्ही स्वत: किंवा तुमच्या शिक्षकांच्या मदतीनं या स्कॉलरशीपबद्दल माहिती मिळवू शकता. 


१. यापैंकीच एक स्कॉलरशीप म्हणजे... सैनिकांच्या, माजी सैनिकांच्या मुलांसाठी पंतप्रधानांनी सुरू केलेली स्कॉलरशीप स्कीम... यासाठीचे फॉर्म पुढील वेबसाईटवरदेखील उपलब्ध आहेत. - 
http://www.desw.gov.in/scholarship


२. लॉरियल इंडिया (मुलींसाठी)
सायन्स, मेडिकल, इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी अशा क्षेत्रात शिकणाऱ्या मुलींसाठी ही स्कॉलरशीप आहे. 
स्कॉलरशीप - २.५ लाख रुपये (प्रत्येक मुलीमागे)
पात्रता - PCM/PCB मध्ये ८५ %, कुटुंबाचं उत्पन्न ४ लाखांपेक्षा कमी 
अधिक माहितीसाठी -  www.b4s.in/UID/LIFYW
 
३. सेंट्रल सेक्टर स्कीम स्कॉलरशीप
स्कॉलरशीप : १० हजार प्रत्येक विद्यार्थ्यामागे 
अधिक माहितीसाठी - www.b4s.in/UID/CSSS


४. इंडियन ऑईल अकॅडमीक स्कॉलरशीप (दहावी, बारावी विद्यार्थ्यांसाठी)
आयटीआय, इंजिनिअरिंग, एमबीबीएस, एमबीएसाठी
स्कॉलरशीप : १० हजार प्रत्येक महिन्याला
अधिक माहितीसाठी - www.b4s.in/UID/IOAS


५. जी. पी. बिर्ला एज्युकेशनल स्कॉलरशीप
पात्रता : बारावी पास, स्टेट बोर्ड ८० टक्क्यांवर... तर सेंट्रल बो४ड ८५ टक्क्यांवर मार्क्स असायला हवेत
सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर, कॉमर्स, आणि लॉ विद्यार्थ्यांसाठी
www.b4s.in/UID/GBES


आणखीन काही स्कॉलरशीप पाहण्यासाठी इथे क्लिक करा