मुंबई : आजकाल आपल्यातील प्रत्येक जण सोयीसाठी एटीएम कार्ड आपल्याजवळ बाळगतो. पण, या तंत्रज्ञानाच्या फायद्याप्रमाणेच त्याचे काही धोकेही आहेत. त्यामुळे हे तंत्रज्ञान वापरताना काही काळजी घेणे गरजेचे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. फसव्या कॉल्सपासून सावध रहा. एटीएम कार्डासंबंधी कोणतीही माहिती देऊ नका.


२. तुमचा पिन क्रमांक नियमीतपणे बदला. 


३. तुमचा पिन क्रमांक लक्षात ठेवा. तो कुठेही लिहून ठेवू नका. खासकरुन तो कार्डावर लिहू नका. 


४. तुमचे एटीएम कार्ड, पिन आणि इंटरनेट बँकिंग यासंबंधिचा तपशील कोणालाही देऊ नका. 


५. एटीएममध्ये कोणालाही आपल्या जवळ येऊ देऊ नका किंवा एटीएम व्यवहारासाठी कोणत्याही अनोळखी व्यक्तीची मदत मागू नका. 


६. एटीएम मशीनला कोणतेही अज्ञात उपकरण किंवा संशयास्पद मशीन लावले आहे असे वाटल्यास तुमचे कार्ड स्वाईप करू नका. 


७. तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करण्यासाठी तुमच्या शाखेला भेट द्या आणि बँकेच्या व्यवहारासंबंधी एसएमएस अलर्ट्स मिळवा.