मुंबई : रिलायन्स कंपनीने आपली 'जियो 4G' सेवा सामान्य ग्राहकांना उपलब्ध केली. याबाबत कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी मुंबईत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही सेवा लॉन्च केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्स जियो 4G मध्ये अनेक सुविधा या फुकटात देण्यात आल्या आहेत. याचा शेअर मार्केटवर चांगलाच परिणाम झाला आहे. मुकेश अंबानींच्या भाषणानंतर फक्त पाऊण तासामध्ये एअरटेल, आयडिया आणि रिलायन्स कम्युनिकेशन्सचे शेअर कोसळले आहेत. फक्त पाऊण तासामध्ये या कंपन्यांचा 13,800 कोटींचा तोटा झाला आहे. 


डिजिटल विश्वातील स्पर्धा तीव्र करणाऱ्या जियोनो ग्राहकांसाठी अत्यंत आकर्षक सुविधा सादर केल्या आहेत. कंपनी सध्या 4G सेवेची चाचणी करत असल्याने रिलायन्स LYF ब्रँडच्या स्मार्टफोन्सवर अनलिमिटेड व्हिडिओ कॉलिंग, अनलिमिटेड इंटरनेट, मेसेजेसची सुविधा दिली जाणार आहे. ग्राहकांचे सिमकार्ड सुरु झाल्यानंतर 90 दिवसांसाठी ही सवलत आहे. 


काय मिळणार?


ग्राहकांना रात्री डेटा फ्री मिळणार 


अवघ्या 50 रुपयांमध्ये मिळणार एक जीबी डेटा 


विद्यार्थ्यांना 25 टक्के अतिरिक्त डेटा 


डिसेंबरपर्यंत डेटा कॉलिंग फ्री


सध्याच्या दरांपेक्षा एक दशमांश दर