मेरठ, उत्तर प्रदेश : 'फ्रीडम २५१'  आज प्रत्येकाच्या तोंडी नाव दिसून येते. अनेकांनी स्वस्तातील स्मार्टफोन घेण्यासाठी उड्याच मारल्या. त्यामुळे ऑनलाईन विक्री थांबविण्यात आली. तर त्याआधी संकेतस्थळ क्रॅश झालं. मात्र, हे यश कोणाचे आहे, याचा शोध घेतला असता तो एक दुकानदारा मुलगा. त्याने हे सर्व कसं शक्य करुन दाखवलं...त्याचीच एक रंजक स्टोरी थक्क करणारी!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'फ्रीडम २५१'ची कल्पना मोहित गोयल याची. कमी पैशात चांगले काहीतरी करण्याचा या तरुणाचा मानस. याच्याच जोरावर त्यांने संपूर्ण देशाला वेड केलं. प्रत्येकाने जगातील कमी किमतीतल स्मार्टफोनवर उड्या मारल्या. बुकींग झपाट्याने झाल्याने अखेर ते थांबवावे लागले.


स्मार्टफोनच्या दुनियेत एक क्रांतीचा अध्याय सुरु केला. 'फ्रीडम २५१'. मोहित हा उत्तर प्रदेश राज्यातील एका लहानशा गावातील किराणावाल्याचा मुलगा. काहीतरी करून दाखवण्याची तयारी आणि द्रष्टेपणाच्या जोरावर तो आज 'रिंगिंग बेल्स' या मोबाइल कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आहे. त्याच्या यशात त्याच्या वडिलांचेही योगदान मोठे आहे.


 


शामली जिल्ह्यातील गढीपुख्ता गाव मोहितच्यामुळे प्रकाशात आले. या गावात गेली अनेक वर्षं 'राम जी' नावाचे एक किराणा मालाचे दुकान आहे. राजेश गोयल ते दुकान चालवतात. मात्र, मोहितमुळे हे दुकान अनेक वर्षानंतर सगळ्या गावकऱ्यांना माहीत पडले. 


मोहित हे नाव दोन दिवसात नावारुपाला आले आणि गावाचा बोलबाला झाला. पिता-पुत्रानं स्मार्टफोनच्या बाजारात एक मोठा धमाका केला आहे. ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती, असा २५१ रुपयांचा स्मार्टफोन तयार करण्याचा चमत्कार मोहितने वडिलांच्या पाठिंब्याने करून दाखवलाय.


 


मोहितचे शिक्षण गावातच झाले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोहितने नोएडाच्या एमिटी विद्यापीठातून इंजिनीअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर स्वत:च काहीतरी असावं असा विचार त्याच्या मनात आला. त्यांने आपली ईच्छा वडिलांना बोलून दाखविली. वडिलांनी ते मनावर घेतले आणि 'फ्रीडम २५१'चा जन्म झाला.


'फ्रीडम २५१' या स्मार्टफोनची निर्मिती झाली. त्यासाठी त्याने 'रिंगिंग बेल्स' या स्वतंत्र कंपनीची स्थापना केली. या कंपनीत वडील राजेश गोयल संचालक असून त्याची पत्नी सीईओ आहे. गुरुवारी राजधानी दिल्लीत २५१ रुपयांच्या स्मार्टफोनचं लाँचिंग झालं, तेव्हा मोहितचं संपूर्ण कुटुंब आणि काही गावकरीही आवर्जून उपस्थित होते.  


भविष्यात 'रिंगिंग बेल्स' कंपनीचं सीमकार्डही आणण्याचा मोहित गोयलचा मानस आहे. आता मोहित स्मार्टफोनविश्वात आणखी काय-काय याची उत्सुकता आहे.