दुसऱ्या वर्धापनदिनी श्योमीचा बंपर सेल
मुंबई : मोबाईल उत्पादक कंपनी श्योमीने भारतीय बाजारात दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तीन दिवसीय कार्निवलचे आयोजन केले आहे. 20 ते 22 जुलै दरम्यान दुपारी 2 वाजता एमआयच्या काही महागड्या उत्पादनांवर विशेष सवलत जाहीर करण्यात येणार आहे.
या कार्निवलमध्ये सहभागी होण्यासाठी ग्राहकांनी 19 जुलैपर्यंत http://www.mi.com या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. यात 2.699 रूपयांच्या ब्लू टूथ स्पीकरवर 700 रूपयांची सूट मिळेल.
तसेच 10000 एमएएचचा एमआय पॉवर बँक, एमआय इन इयर कॅप्सूल, हेडफोन आणि एमआय इन इयर हेडफोन्स प्रो गोल्ड अशा काही उत्पादनांचा मर्यादीत स्टॉक विक्रीसाठी उपलब्ध होईल.