स्नॅपडीलच्या मार्केटिंग शुल्कात १८% पर्यंत कपात
स्नॅपडीलने आपल्या मार्केटिंग शुल्कामध्ये कपात करण्याचे ठरविले आहे. स्नॅपडील भारतातील ऑनलाइन व्यापार क्षेत्रातील आघाडीची कंपनी मानली जाते.
मुंबई : स्नॅपडीलने आपल्या मार्केटिंग शुल्कामध्ये कपात करण्याचे ठरविले आहे. स्नॅपडील भारतातील ऑनलाइन व्यापार क्षेत्रातील आघाडीची कंपनी मानली जाते.
स्नॅपडीलने आपल्या डिजिटल, इलेक्ट्रॉनिक्स, महिलांची फॅशन, जलदगती ग्राहकवस्तू उत्पादने यासह सुमारे १२० उपवर्गांमध्ये या शुल्कामध्ये ही कपात करणार आहे. परंतु, त्याचवेळी ३० उपविभागामधील मार्केटिंग शुल्क वाढविण्यात येणार आहे.
नवे शुल्क या आठवड्यापासून लागू होणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. विक्रेत्यांकडून आलेल्या प्रतिसादानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
कंपनीने मार्केटिंगचे नवे धोरण आखले आहे, यामगे अधिक ग्राहकांना आकर्षित करण्याच्या उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे .