टी शर्ट घाला आणि बॅटरी चार्जिंगचं टेन्शन विसरा
आपल्याला कायम मोबाईल चार्ज करण्याचं टेन्शन असतं. मोबाईलची बॅटरी कधी उतरेल हे काही सांगता येत नाही. मात्र, यावर एका इंजिनीअर विद्यार्थ्यानं तोडगा काढलाय. त्यानं एक असं एक टी-शर्ट तयार केलंय की ज्यामुळं तुमची मोबाईल चार्ज करण्याचं टेन्शन दूर होईल.
रुफी झैदी, गाझियाबाद : आपल्याला कायम मोबाईल चार्ज करण्याचं टेन्शन असतं. मोबाईलची बॅटरी कधी उतरेल हे काही सांगता येत नाही. मात्र, यावर एका इंजिनीअर विद्यार्थ्यानं तोडगा काढलाय. त्यानं एक असं एक टी-शर्ट तयार केलंय की ज्यामुळं तुमची मोबाईल चार्ज करण्याचं टेन्शन दूर होईल.
बी टेकच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी असलेल्या पवन कुमारचे हे हरितशक्ती टी-शर्ट आहे. पवननं एक असं टी-शर्ट तयार केलंय ज्यापासून मोबाईल फोन चार्ज केला जाऊ शकतो. टी-शर्टच्या पुढच्या बाजूला एक छोटं सौरपॅनेल लावण्यात आलं असून त्यातून सौर ऊर्जा निर्मिती होते. पॅनलला एका तारेनं जोडलं असून ती तार मोबाईल चार्ज करणाऱ्या पिनपर्यंत पोहचते.
पवनचा हा मोबाईल चार्जरचा आविष्कार त्याच्या मित्रांनाही भावलाय. पवनच्या शिक्षकांनीही या प्रयोगाबद्दल त्याचं तोंडभरुन कौतुक केलंय. नवनवे प्रयोग करणं पवनला भावतं. मोबाईल चार्ज करणारे टी-शर्ट तयार करण्यासाठी त्याला फक्त 15 दिवस लागले. त्यासाठी अवघे पाचशे रुपये खर्च आलाय.
आता पवनच्या नजरा नव्या आविष्काराकडे लागल्यात. त्याला एक अशी कचराकुंडी बनवायचीय जी भरल्यानंतर संबधित विभागाला आपोआप मोबाईलवरुन मेसेज पाठवला जाईल. रॅन्चोरुपी पवनचे आविष्कार नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागतील.