मुंबई : मुलींसोबत बोलणं ही देखील एक कला असते असं मुलं मानतात. ती खरंच एक कलाच आहे. मुलींना राग लवकर येतो त्यामुळे बोलतांना खूप सांभाळून बोलावं लागतं. तुम्ही जर कोणत्या मुलीला पहिल्यांदा भेटणार आहात तर मग तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. कारण फर्स्ट इंप्रेशन इस लास्ट इंप्रेशन.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. ज्यास्त डिफेंसिव होऊ नका : मुलींसोबत बोलतांना अनेकदा मुलं असं दाखवतात की त्यांना मुलीची खूप काळजी आहे. पण असं जास्त दाखवू नका. कारण प्रत्येकाला स्वत:च्या चांगल्या वाईट गोष्टी माहित असतात आणि काय करायचंय काय नाही हे प्रत्येकाला माहित असतं. मुलींना मुलांकडून कौतूक होणं आवडतं पण खोटं कौतूक करु नका. खोटं कौतूक केल्यास ते लगेचच मुलींच्या लक्षात येतं. मुलींसोबत बोलतांना तुम्ही जसे आहात तसेच वागा. 


2. योग्य जागेची निवड करा - मुलींसोबत बोलतांना योग्य जागा आणि योग्य वेळ साधणं खूप महत्त्वाचं असतं. कोणत्याही कामात व्यस्त असतांना त्यांच्याशी बोलणं ठिक नसतं. यामुळे त्यांना इरिटेट देखील होऊ शकतं. मुली अनोळखी मुलींसोबत बोलणं कमी पसंत करतात. डिस्को किंवा पबमध्ये मुलींसोबत बोलणं योग्य असू शकतं कारण यावेळेत त्या सोशल मूडमध्ये आणि फ्री असतात.


3. खूप ड्रिंक करु नका- मुलींना असे मुलं आवडत नाही जे खूप ड्रिंक करतात. ड्रिंक केल्यानंतर तुमचं स्वत:वर नियंत्रण राहत नाही. अशा वेळेत जर तुम्ही कोणती गोष्ट त्यांच्यासमोर बोललात जी तुम्हाला नव्हती बोलली पाहिजे होती. मुलींसमोर ड्रिंक करणं टाळाच.


4. डोळ्यात डोळे घालून बोला : कोणासोबतही बोलतांना आय कॉन्टॅक्ट महत्त्वाचे असतात. मुलींसोबत बोलतांना जर तुम्ही त्यांच्या डोळ्यात बघून बोलाल तर त्यांना वाटेल की तुम्ही त्यांची गोष्ट लक्षपूर्वक ऐकत आहात. मुलीसोहब बोलतांना तिला देखील तुमच्याशी बोलणं सहज वाटलं पाहिजे. 


5. फक्त स्वत:बाबत नका बोलू : मुलांना या गोष्टीकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे की, त्यांनी फक्त स्वत: बद्दल बोलू नये. फुटबॉल, क्रिकेट आणि पॉलिटिक्स बाबत जर तुम्ही त्यांच्याशी बोलत असाल आणि त्यांना जर या सगळ्या गोष्टींची आवडच नाही तर मग यामुळे तुमची इमेज खराब होऊ शकते. कोणतीही गोष्ट बोलतांना मुलगी देखील त्यावर बोलते आहे का याकडे लक्ष द्या तरच ती पुढे वाढवा. मुलींना त्यांना स्पर्ष करणे आवडत नाही. थोडा वेळ घ्या. जेव्हा ती स्वत: तुमच्यासोबत फ्रँक्ली वागेल तेव्हाच तुम्ही देखील सहजपणे वागा.