नवी दिल्ली : जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम २५१ स्मार्टफोनबाबक सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेलिकॉम मंत्रालयाने संयुक्त सचिवांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यांची समिती बनवली आहे. ही समिती कंपनीच्या कामावर नजर ठेवून राहणार आहे. जर २५१ रुपयांना मोबाईल देण्यास कंपनी असमर्थ ठरल्यास त्यांच्यावर कारवाई होईल. 


कोणत्याही परिस्थितीत रिंगिग बेल्स लोकांचे पैसे बुडवू शकणार नाही. कंपनीने २५१ रुपयांत स्मार्टफोन उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिलेय. हे आश्वासन कंपनी कसे पूर्ण करणार यावर ही टेलिकॉम मंत्रालयाने नियुक्त केलेली चार सदस्यांची समिती नजर ठेवणार आहे. 


रिंगिंग बेल्स या कंपनीने जगातील सर्वात स्वस्त २५१ रुपयांत स्मार्टफोन उपलब्ध करुन देण्याची घोषणा केल्यानंतर ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. तब्बल सात कोटी लोकांनी या स्मार्टफोनसाठी रजिस्ट्रेशन केल्याचा दावा कंपनीने केलाय. मात्र या स्मार्टफोनवरुन अनेक सवाल उपस्थित केले जातायत. इतक्या कमी किंमतीत स्मार्टफोन कसा काय मिळू शकतो असा सवाल उपस्थित केला जातोय.