मुंबई : शिक्षणाच्या दृष्टीनं इंजिनिअरिंग, मेडिकल, सीए आणि आयटी क्षेत्राला विद्यार्थी सर्वाधिक पसंती देतात. या क्षेत्रातून शिक्षण घेतलेल्यांना भरघोस पगार मिळतो असा सर्वसामान्यांचा अंदाज आहे. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. तुम्ही कधी विचारही केला नसेल अशा नोकऱ्यांमध्ये सध्या सर्वाधिक पगार मिळत आहे. 


सोल्युशन आर्किटेक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका चांगल्या सोल्युशन आर्किटेकला 80 लाख रुपयांपर्यंतचा पगार मिळतो. सोल्युशन आर्किटेक कोणत्याही कंपनीच्या आवश्यकतेनुसार प्रोजेक्ट प्लॅनिंग करतो, यामुळे कंपनीच्या नफ्यामध्ये मोठी वाढ होते. भारतामध्ये टेक्नॉलीजीच्या कंपन्यांना सोल्युशन आर्किटेकची सगळ्यात जास्त आवश्यकता असते. 


डाटा साइंटिस्ट


डेटा साइंटिस्टना सध्या मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. या क्षेत्रातल्यांना चांगला अनुभव असेल तर 75 लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. इंजिनियरला 5 वर्षांच्या नोकरीनंतर 8 ते 12 लाखांचं पॅकेज मिळतं पण डाटा साइंटिस्टना 5 वर्षांच्या अनुभाववर 75 लाख रुपयांपर्यंतचं पॅकेज मिळू शकतं. 


पुढच्या दोन वर्षांमध्ये भारतात 2 लाख डाटा साइंटिस्टची गरज भासणार आहे. अमेरिकेमध्ये डेटा साइंटिस्टला 1.5 लाख डॉलरपर्यंतचा पगार मिळतो. 


मोबाईल डेव्हलपर


चार ते पाच वर्षांचा अनुभव असणाऱ्या मोबाईल डेव्हलपरना 60 लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो. भारतामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये मोबाईल मार्केट अजून झपाट्यानं वाढणार आहे, त्यामुळे मोबाईल डेव्हलपरची मागणीही वाढणार आहे. 


डेटा ऍनालिटिक्स मॅनेजर


पाच वर्षांपर्यंतचा अनुभव असलेल्या डेटा ऍनालिटिक्स मॅनेजरला 40 ते 60 लाख रुपयांचा पगार मिळू शकतो. डेटा ऍनालिटिक्स मॅनेजर कंपनीचा डेटा मॅनेज करतो, ज्यामुळे कंपनीचा व्यवसाय वाढायला मदत होते. 


प्रोडक्ट मॅनेजर


चार ते पाच वर्षांचा अनुभव असणाऱ्या प्रोडक्ट मॅनेजरला 15 लाख ते 40 लाखांपर्यंत पगार मिळू शकतो.