मुंबई: स्मार्टफोनसाठी सगळ्यात जास्त वापरण्यात येणारी ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे अँडरॉईड. सध्या अँडरॉईडचं 6.0 मार्शमेलो व्हर्जन स्मार्टफोनसाठी वापरलं जात आहे. हे व्हर्जन तुमच्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करण्यापूर्वी या दहा गोष्टी लक्षात घ्या. 


1 अपडेट विषयी माहिती घ्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अँडरॉईड मार्शमेलो अपडेट करण्यापूर्वी यातले फायदे आणि तोटे जाणून घ्या. मार्शमेलो अपडेट केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये बदल होतात. पण तुम्ही तुमच्या अँडरॉईड लॉलीपॉप व्हर्जनवर खुष असाल, तर मार्शमेलोवर जाऊ नका. 


2 सगळ्या फाईल्सचा बॅक अप घ्या


मार्शमेलो अपडेट करण्याआधी तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या सगळ्या महत्त्वाच्या फाईल्सचा बॅक अप घेऊन ठेवा. कारण फोन अपडेट झाल्यानंतर आधीच्या काही फाईल्सचं नुकसान व्हायची शक्यता असते. त्यामुळे कॉन्टेक्ट्स, फोटो, व्हिडिओ आणि गाण्यांचं बॅक अप घ्यायला विसरू नका. 


3 जंक क्लिन करा


अपडेट करण्यापूर्वी फोनमधल्या सगळ्या जंक फाईल डिलीट करा. या जंक फाईल्समध्ये तुमची गाणी, व्हिडिओ,  


4 फोन चार्ज ठेवा


अँडरॉईड मार्शमेलो अपडेट करण्यापूर्वी तुमचा फोन किमान 80 टक्क्यांपर्यंत चार्ज ठेवा, कारण अपडेट करताना बॅटरीचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. 


5 मार्शमेलोचे फिडबॅक पाहा


फोन अपडेट करण्यापूर्वी इंटरनेटवर मार्शमेलोचे फिडबॅकही जाणून घ्या. त्यामुळे तुम्हाला त्याचे फायदे आणि तोटे लक्षात येतील. 


6 मार्शमेलो क्रॅश करणारे ऍप


फोन अपडेट करण्यापूर्वी कोणती ऍप मार्शमेलोला क्रॅश करु शकतात याची माहिती घ्या, आणि फोन अपडेट झाल्यानंतर ही ऍप इन्स्टॉल करू नका. 


7 ऍप परमिशनची माहिती घ्या


 अँडरॉईडच्या इतर व्हर्जनपेक्षा मार्शमेलोची परमिशन सेटिंग वेगळी असू शकते. त्यामुळे याविषयी पहिले जाणून घ्या. 


8 आयटी डिपार्टमेंटशीही बोला


ऑफिसच्या कामासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर करत असाल तर मार्शमेलो अपडेट करण्यापूर्वी ऑफिसच्या आयटी डिपार्टमेंटशीही बोलून घ्या, आणि अपडेटनंतरही ऑफिसचे प्रोग्रॅम किंवा ऍप काम करतील का याची खात्री करून घ्या. 


9 ऍप अपडेटविषयी समजून घ्या


मार्शमेलो व्हर्जनमध्ये ऍप अपडेट कशा होतात, याविषयी आधी समजून घ्या. कदाचित काही नवे अपडेट्स जुन्या फिचर्सला सपोर्ट करणार नाहीत.   


10 उपयोगी आहे का ते पाहा


मार्शमेलो अपडेट करण्याआधी ते तुमच्या खरच उपयोगाचं आहे का ते पाहा. मार्शमेलोचा इंटरफेस आणि त्याचे फिचर्स आवडले तरच मार्शमेलो इन्स्टॉल करा.