truecaller वरून असा हटवा तुमचा नंबर
ट्रू-कॉलर हा अॅप अनेकांच्या स्मार्टफोनमध्ये आहे. एखादं अनोळखी मोबाईल नंबर कोणाचा आहे हे जाणून घेण्यासाठी या अॅपचा वापर केला जातो. तुम्ही हा अॅप इंस्टॉल केला नसेल तरी त्यामध्ये तुमचा नंबर आणि नाव दाखवलं जातं.
मुंबई : ट्रू-कॉलर हा अॅप अनेकांच्या स्मार्टफोनमध्ये आहे. एखादं अनोळखी मोबाईल नंबर कोणाचा आहे हे जाणून घेण्यासाठी या अॅपचा वापर केला जातो. तुम्ही हा अॅप इंस्टॉल केला नसेल तरी त्यामध्ये तुमचा नंबर आणि नाव दाखवलं जातं.
पण जर तुम्हाला तुमचं नाव तुमच्या नंबरवर दाखवायचं नसेल तर तुम्ही ते करू शकता. त्यासाठी तुम्हाला आम्ही काही गोष्टी सांगणार आहोत.
सर्वात आधी ट्रू-कॉलर डिअॅक्टिव्ह करा ंमग...
अँड्रॉईड युजर्स : अॅपवर क्लिक करा - अॅपमध्ये डाव्या बाजूस पीपुल आयकॉनवर क्लिक करा - सेटिंग्ज - अबाऊट -
आयफोन युजर्स : अॅपवर क्लिक करा - अॅपमध्ये उजव्या बाजूस असलेल्या गियर आयकॉनवर क्लिक करा - अबाऊट ट्रूकॉलर - त्यानंतर खाली जा आण ट्रूकॉलर डिअॅक्टिव्ह करा
विंडोज युजर्स : अॅपवर क्लिक करा - अॅपमध्ये खालच्या बाजूस उजव्या बाजूला तीन डॉट असलेलं एक आयकॉन असेल, त्यावर क्लिक करा - सेटिंग्ज - हेल्प - ट्रूकॉलर अकाऊंट डिअॅक्टिव्ह करा.
ट्रूकॉलरवरुन तुमचा मोबाईल नंबर हटवा. ट्रूकॉलर अनलिस्ट पेजवर जा. देशाच्या कोडसह मोबाईल नंबर टाईप करा. अनलिस्ट करण्याचं कारण निवडा. व्हेरिफिकेशन कॅप्चा टाईप करा त्यानंतर अनलिस्टवर क्लिक करा.
अनलिस्ट रिक्वेस्ट आल्यानंतर 24 तासांच्या आत मोबाईल नंबर हटवला जातो. काही वेळा एका वर्षासाठी नंबर अॅपमधून नंबर डिलीट केला जातो. त्यामुळे एका वर्षानंतरही तुम्ही ट्रूकॉलर तुमचा नंबर काढून टाकू शकता.