मुंबई : एका गरीब कुटुंबात जन्म, अशी देखील वेळ आली की जेवनासाठी त्याच्या आईला तिचे दागिने विकावे लागले. या मुलाला लहानपणापासूनच कपडे बनवण्याचा छंद होता. आज तोच मुलगा इतका मोठा झाला आहे की, बॉलिवूडपासून, व्यापारी ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कपड देखील तोच तयार करतो. ट्रॉय कोस्टा असं या व्यक्तीचं नाव आहे. फॅशन डिजाईनर पेक्षा यांना स्वत:ला टेलर म्हणून घेणं पसंद आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचे सूट खूप चर्चेत आले. मोदींच्या या स्टायलिश सूटच्या चर्चा परदेशातही खूप झाल्या. पण त्यामागे होता टेलर ट्रॉय यांचा हात. 


तुम्ही कोणत्याही मोठ्या व्यक्तींचं नाव घ्या त्यामध्ये 10 पैकी 5 व्यक्तींचे कपडे यांनीच डिजाईन केले असतील. अनेक मोठी नावं हे ट्रॉयचे क्लाईंट आहेत. जो त्यांच्या दुकानात स्वत: येता त्यांचेच कपडे ट्रॉय शिवतात. ही त्यांची खासियत आहे.


ट्रॉयचे बॉलिवूडचे पहिले क्लाइंट आदित्य पंचोली आहेत. त्यानंतर अनिल कपूर, हृतिक रोशन, शाहिद कपूर, फरहान अख़्तर यासारखे अनेक सेलिब्रिटी त्याचे क्लाईंट बनत गेले.


फॅशन आणि कपडे शिवण्याची प्रेरणा त्याने त्याच्या आईपासून घेतली आणि समोर राहणाऱ्या एका महिलेकडून त्याने टेलर काम शिकलं. लहानपणापासूनच मी टेलर बनणार असं ट्रॉय बोलायचे. 2008 पासून त्यांनी पुरुषांसाठी कपडे शिवणे सुरु केले.