वॉशिंग्टन : अमेरिकेत एका व्यक्तीने पोकेमॉन गो हा व्हिडीओ गेम खेळणाऱ्या दोन किशोरवयीन युवकांना गोळ्या घातल्या आहेत, त्यांना चोर समजून त्यांच्यावर त्याने गोळ्या घातल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे दोन्ही युवक रात्री पोकेमॉन गो गेम खेळत होते. दोन्ही युवक खेळताना कार चालवत चालवत ओरलँडोच्या उत्तर-पूर्व भागातील पाम कोस्ट एरियात जाऊन पोहोचले.


एका व्यक्तीने आपल्या घराबाहेर पाहिलं, तेव्हा हे दोन्ही युवक त्याच्या कारपर्यंत पोहोचले, त्याने दोन्ही जणांवर गोळ्या झाडल्या.


पोकेमॉन गो हा गेम अतिशय वेगात लोकप्रिय होत आहे, हा एक रियलिटी गेम आहे.


या गेमला फोनच्या जीपीएसच्या मदतीने खरोखरच्या जगात चालता फिरता येते खेळता येते, आणि व्हर्च्युअल मॉन्सटर्स पकडता येतात. प्लेअर स्मार्टफोनवर हा गेम खेळताना रिअल लाईफ लोकेशन्सवर जातात.