मुंबई : आज इंटरनेट वापरणाऱ्यांची सख्या वाढली आहे. पण भारतात अजूनही इंटरनेटशी संबंधीत अधिक समस्या दिसतात. इंटरनेटचा स्पीड अजूनही कमी आहे.
पण आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा इंटरनेट स्पीड वाढणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंटरनेट वापरतांना नवीन ब्राऊसर वापरा. ब्राऊसर अपडेटेड असल्यास इंटरनेट सर्फिंगसाठी चांगला स्पीड मिळतो. 


स्क्रीन सेवर, ब्राऊजर एक्सटेंशन आणि वेब टूलबार बंद करुन ठेवा. 


सॉफ्टवेयरचे ऑटोमेटिक अपडेट नेहमी बंद ठेवा. गरज असेल तेव्हा अपडेट करुन घ्या. 


रियल विंडोजचा वापर करा आणि त्याचे सर्व अपडेट्स वेळेवर घ्या.


वाय-फाय वापरतांना नेहमी पासवर्ड ठेवा. इतर कोणीही जर तुमच्या इंटरनेटचा वापर करत असेल तर त्यामुळे तुमच्या इंटरनेटचा स्पीड कमी होतो.  


कमी-जास्त पॉवरचाही वेगावर परिणाम होतो. त्यामुळे ते दुरूस्त करुन घ्या. 


ऑपरेटिंग सॉफ्टवेयर जसे, XP आणि आणि जुने संगणकही वेगावर परिणाम करते.


काही नवीन सॉफ्टवेअर देखील आता आले आहे जे इंस्टॉल केल्यानंतर स्पीड वाढण्यास मदत करतात.