मुंबई : अनेक प्राण्यांना मानसाळलेलंही पाहिलं असेल... पण, जंगली प्राण्यांमध्ये दिसलेली मानवता मात्र फार अभावानेच दिसते.


यूएनच्या शांतिदूत असलेल्या जेन गुडाल यांचा एक व्हिडिओ सध्या यासाठीच लक्ष वेधून घेताना दिसतोय. गेल्या ५५ वर्षांपासून त्या गोम्बे स्ट्रीम राष्ट्रीय उद्यान आणि टांझानियामध्ये आढळणाऱ्या चिम्पांझीवर अभ्यास करत आहेत. यासाठीच काम करणारं त्यांची 'जेन गुडाल संस्था' प्रसिद्ध आहे.


जेन यांच्या या व्हिडिओत एका चिम्पाझीला उपचारानंतर जंगलात पुन्हा सोडण्यात येताना दिसतंय... त्यावेळी या चिम्पाझीनं केलं ते आत्तापर्यंत तुम्हाला क्वचितच पाहायला मिळालं असेल.