मुंबई : कुत्रा हा अत्यंत निष्ठावान प्राणी असल्याचं समजलं जातं. जशा माणसाला भावना असतात तशाच एखाद्या प्राण्यालाही असतातच की... फरक इतकाच मानवाला आपल्या भावना बोलून व्यक्त करता येतात, पण प्राण्यांना नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण, एक कुत्रा मात्र आपल्या भावना व्यक्त करण्यातही तरबेज आहे. त्याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झालाय.


या व्हिडिओत कुत्र्याचा मालक त्याच्यावर खोटंखोटंच रागावलेला दिसतोय... तर कुत्रा मात्र आपल्या मालकाची माफी मागण्याचा, त्याला मनवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.  


आत्तापर्यंत फेसबुकवर हा व्हिडिओ १०,०३७,६३० लोकांनी पाहिलाय.