मुंबई: आयडिया आणि एअरटेलनंतर आता व्होडाफोननंही त्यांच्या इंटरनेट डेटा ऑफरमध्ये बदल केले आहेत. व्होडाफोनच्या ग्राहकांना आता तेवढ्याच पैशांच्या पॅकमध्ये जास्त इंटरनेट डेटा मिळणार आहे. हा इंटरनेट डेटा 50 टक्के ते 67 टक्के एवढा जास्त असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

650 रुपयांच्या  3G/4G इंटरनेट पॅकमध्ये आता 5 GB डेटा मिळणार आहे. याआधी याच किंमतीमध्ये ग्राहकांना 3 GB डेटा मिळत होता. 499 रुपयांच्या 3G/4G इंटरनेट पॅकमध्ये आता 2 GB ऐवजी 3 GB डेटा मिळेल.  999 च्या 3G/4G इंटरनेट पॅकमध्ये ग्राहकांना 10 GB डेटा मिळणार आहे.