मुंबई : आपल्या घरी किराना सामान किंवा फूड डिलिव्हरी आता रोबोट द्वारे होऊ शकते. भविष्यात हे वास्तवात उतरण्याची शक्यता आहे. तुम्ही खालील व्हिडिओ पाहिलात तर ते तुमच्या लक्षात येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फूटपाथवरून स्वयं ड्रायव्हिंग करणारा रोबोट पाहायला मिळू शकतो. सिलिकन व्हॅलीमध्ये एक स्वयं ड्रायव्हिंग करणाऱ्या रोबोटची चाचणी घेण्यात आली. स्टारशिप टेक्नोलॉजीज या कंपनीने याबाबत दावा केला आहे. हा रोबो ९० टक्के स्वयं ड्रायव्हिंग करतो. या रोबोटने एका ज्येष्ठ नागरिकाला त्याचे फूड पार्सल पोहोच केले.


ही सुविधा व्यावसायिक तत्वावर सुरु करण्याचा कंपनीचा विचार आहे. कंपनीने आतापर्यंत १२ देशांमधील ४० शहरात याची चाचणी केली आहे.



Video courtesy: Starship Technologies/YouTube