मुलीला जोडीदाराच्या या 7 गोष्टी आवडतात
प्रत्येक महिलेला असे वाटते की तिचा जोडीदार नेहमी निरोगी असावा. त्यामुळेच लग्न ठरत असल्यास महिला अशा पुरुषाची निवड करते जो फिट आणि आनंदी दिसत असेल. त्यासाठी पुरुषांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असते.
मुंबई : प्रत्येक महिलेला असे वाटते की तिचा जोडीदार नेहमी निरोगी असावा. त्यामुळेच लग्न ठरत असल्यास महिला अशा पुरुषाची निवड करते जो फिट आणि आनंदी दिसत असेल. त्यासाठी पुरुषांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असते.
1. आपल्या पार्टनरचा स्टॅमिना अधिक असला पाहिजे असे महिलांना वाटते. तसेच कोणतेही काम त्याने उत्साहाने केले पाहिजे.
2. पोट सुटलेले पुरुष महिलांना आवडत नाहीत. त्यामुळे पोट वाढणार नाही. तुम्ही फिट अँड फाईन दिसाल याकडे पुरुषांनी लक्ष द्यावे.
3. महिलांना असा जोडीदार हवा असतो जो झोपेत घोरणार नाही. त्यामुळे तुम्हालाही ती सवय असेल तर त्यावर उपाय करा.
4. स्वच्छतेला महत्त्व देणारे पुरुष महिलांना आवडतात.
5. दातांचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे. ज्याची स्माईल चांगली असेल अशा पुरुषांकडे महिला आकर्षित होतात.
6. विरळ केस अथवा टक्कल असलेले पुरुष अधिकतर महिलांना आवडत नाहीत.त्यामुळे केसांच्या आरोग्यासाठीही जरुर उपाय करा.
7. स्मोकिंग अथवा ड्रिंक्सचे व्यसन असलेले पुरुष महिलांना आवडत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जर याची सवय असेल तर ती लगेच बंद करा.