हँडसम पुरुषाला पाहिल्यावर महिलांच्या मनात हे येतात विचार
सुंदर स्त्रीपाहिल्यावर फक्त पुरुषांच्याच मनात लड्डू फुटतात असं नाही. एखादा हँडसम पुरुष दिसल्यास महिलांच्या मनातही लड्डू फुटायला लागतात. ही वेगळी गोष्ट की त्या मनातील ही गोष्ट कोणाला सांगत नाहीत.
मुंबई : सुंदर स्त्रीपाहिल्यावर फक्त पुरुषांच्याच मनात लड्डू फुटतात असं नाही. एखादा हँडसम पुरुष दिसल्यास महिलांच्या मनातही लड्डू फुटायला लागतात. ही वेगळी गोष्ट की त्या मनातील ही गोष्ट कोणाला सांगत नाहीत.
महिला सिंगल असल्यास ती विचार करते कदाचित हा माझा बॉयफ्रेंड असा हँडसम असता तर. जर त्या पुरुषाचे लग्न झाले असेल तर अशा पुरुषाची कंपनी मिळाली तर किती छान होईल असा विचार महिला करतात.
जर महिला एखाद्या पुरुषाशी कमिटेड असेल तर आपला बॉयफ्रेंड अथवा नवरा असा हँडसम असता तर किती बरे झाले असते असा विचार ती महिला करते.
हँडसम पुरुषाला पाहिल्यावर कदाचित हा आधी भेटला असता तर मी कमिटेड झाले नसले असते असाही विचार अनेकदा महिलांच्या मनात येतो.