व्हॉट्सअॅपचं नवं फिचर, आता मित्रांना करता येणार टॅग
व्हॉट्सअॅप वारणाऱ्या यूझर्सना आता आणखी एका फीचरचा आनंद घेता येणार आहे. फेसबूक आणि ट्विटरप्रमाणे जसे @ टाईप केल्यावर नावं दिसतात तसेच आता व्हॉट्सअॅपवरही तुम्ही टॅग करु शकणार आहात.
मुंबई : व्हॉट्सअॅप वारणाऱ्या यूझर्सना आता आणखी एका फीचरचा आनंद घेता येणार आहे. फेसबूक आणि ट्विटरप्रमाणे जसे @ टाईप केल्यावर नावं दिसतात तसेच आता व्हॉट्सअॅपवरही तुम्ही टॅग करु शकणार आहात.
ग्रुप चॅटमध्ये देखील हे फीचर तुम्हाला वापरता येणार आहे. कितीही जणांना तुम्ही टॅग करु शकणार आहात. नंबर सेव्ह नसल्यास तुम्हाला तो नंबर टॅग करावा लागणार आहे. फेसबूक, ट्विटरप्रमाणे टॅग केल्यानंतर त्या व्यक्तीचं नाव हायपरलिंकमध्ये दिसेल.
अँड्रॉईड आणि iOS यूझर्सना ही सुविधा सध्या उपलब्ध करुन देण्यात आली आहे, व्हॉट्सअॅप वेबसाठी हे फीचर वापरता येणार नाही. तुम्ही ज्या नावाने नंबर सेव्ह केला आहे त्याच नावाने ते इतरांनाही दिसेल.