तुम्हालाही व्हॉट्सअॅप गोल्ड व्हर्जनचा मेसेज आलाय का?
तुम्ही व्हॉट्सअॅप यूझर आहात तर तुमच्या अकाऊंटवर हा मेसेज कदाचित आला असेल. व्हॉट्सअॅपचे नवीन गोल्ड व्हर्जनचे अप़़डेट आल्याचा हा मेसेज आहे.
मुंबई : तुम्ही व्हॉट्सअॅप यूझर आहात तर तुमच्या अकाऊंटवर हा मेसेज कदाचित आला असेल. व्हॉट्सअॅपचे नवीन गोल्ड व्हर्जनचे अप़़डेट आल्याचा हा मेसेज आहे.
व्हायरल होतोय हा मेसेज
व्हॉट्सअॅपचे गोल्डन व्हर्जन लीक झाले आहे. हे व्हर्जन आता तुम्हीही वापरु शकता. याद्वारे व्हिडीओ कॉलिंग, चुकून पाठवलेले मेसेज डिलीट करण्याची सुविधा आहे. तसेच फ्री कॉलिंग, थीम बदलणे तसेच एकाच वेळेस १०० फोटो पाठवण्याचीही सोय आहे. या लिंकवर क्लिक करुन गोल्डन व्हर्जन अपडेट करा.https://www.goldenversion.com/” अशा प्रकारचा मेसेज सध्या फिरतोय.
मेसेजपासून सावधान
मात्र अशा मेसेजपासून सावधान! हा मेसेज केवळ एक अफवा आहे. व्हॉट्सअॅपने असं कोणतंही व्हर्जन तयार केलेलं नाहीये. या लिंक केवळ अफवा आहेत. या लिंकवर क्लिक केल्यास 404 Error पेज सुरु होते. यामुळे हॅकर्स तुमची माहिती चोरुही शकतात.