मुंबई : व्हॉट्सअॅपवर अनेकदा चुकून मॅसेज अशा कोणाला तरी चालले जाताता ज्यांना आपल्याला ते पाठवायचे नसतात. अनेकदा तर यामुळे अनेकांना याचा वाईट सामना करावा लागतो. पण आता या समस्येपासून लवकरच सूटका होणार आहे. व्हॉट्सअॅप यावर काम करत आहे की ज्यामुळे तुम्ही पाठवलेले मॅसेज पुन्हा अनसेंड करु शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार फेसबूकचं स्वामित्व असणाऱ्या व्हॉट्सअॅप आता या सुविधेवर काम करत आहेत. लवकरच ही सुविधा तुमच्या व्हाट्सअॅप तुम्हाला मिळू शकते. पाठवलेले मॅसेज डिलीट करणे, एडीट करणे या सारख्या गोष्टींची सुविधा व्हॉटसअॅप देऊ शकते. मॅसेज पाठवल्यानंतर पाच मिनिटाच्या आत एक मॅसेज रद्द करण्याचा पर्याय कंपनी देऊ शकते.


मागील वर्षी देखील एक अशी अफवा पसरली होती की व्हॉट्सअॅप असा फीचरवर काम करतंय पण तसं काहीही नव्हतं. सध्या अशा अनेक समस्यांवर कंपनी काम करते आहे पण अजून तरी कंपनीने लोकांसाठी ही सुविधा सुरु केलेली नाही.