नवी दिल्ली : व्हॉट्सअॅप यूझर्ससाठी ही महत्त्वाची बातमी आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत व्हॉट्सअॅप ब्लॅकबेरी ओएसला सपोर्ट करणार नसल्याचे मेसेजिंग सर्व्हिस व्हॉट्सअॅपने जाहीर केलेय. यात ब्लॅकबेरीचा लेटेस्ट व्हर्जन ब्लॅकबेरी १०चाही समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्हणजेच पुढील वर्षापासून ब्लॅकबेरी ओएसवर चालणारे स्मार्टफोन वापरणाऱ्यांना व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही. 


या यादीत केवळ ब्लॅकबेरीच नाही तर नोकियाच्या S40 सीरिज स्मार्टफोन, नोकिया सिम्बियन S60, अँड्रॉईड २.१, अँड्रॉईड २.२ आणि विंडोज फोन ७.१ यांचाही समावेश आहे. या सर्वांवरही पुढील वर्षांपासून व्हॉट्सअॅप सपोर्ट बंद होईल. 


जर तुमच्याकडेही या प्लॅटफॉर्मवर चालणारे स्मार्टफोन आहेत तर नव अँड्रॉईड, आयफोन आणि विंडोज फोन अपग्रेड करण्याची गरज आहे.