बर्लिन : आकाशात आपल्याच धुंदीत भरारी मारणाऱ्या पक्ष्यांबद्दल नवा खुलासा झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संशोधनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, पक्षी उडतानाच कोणत्याही अडथळ्याला धडक दिल्याशिवय किंवा आकाशातून खाली न पडताच आकाशात विहंगत असतानाच एक डुलकी काढतात. 


जर्मनीचे मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटच्या नील्स रॅटेनबर्ग यांनी अनेक देशांतील आपल्या सहकाऱ्यांसोबत एक टीम बनवली... आणि 'फ्रिगेटबर्डस'च्या मानसिक स्थितीचा अभ्यास केला. 


यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की उडतानाच पक्ष्यांच्या मेंदूचा एक भाग किंवा दोन्हीही भागांसहीत डुलकी मारू शकतात. 


हो, पण उडताना मात्र हे पक्षी एक तासाहून कमी वेळ झोपतात. जमिनीवर असताना मात्र हे पक्षी अधिक वेळ झोप काढतात. हे संशोधन नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालंय.