मुंबई : व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने चायनीज स्मार्टफोन कंपनी शाओमी आपल्या स्मार्टफोनवर डिस्काउंट देणार आहे. #OnlyWithMiसोबत कंपनी अनेक स्मार्टफोन्सवर शानदार ऑफर देतेय. Mi4वरही चांगला डिस्काउंट मिळतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेडमी स्मार्टफोन खरेदी केल्यावर त्याच्यासोबत २०० रुपयांचे इयरफोन मोफत मिळतील तसेच Mi4च्या १६ जीबी मॉडेलवर दोन हजारांपर्यंचे डिस्काउंट मिळतोय. http://www.mi.com/in/ या वेबसाइटवर कंपनीने या ऑफर दिल्यात. 


'रेडमी ३' मध्ये काय आहे खास
शाओमी रेडमी ३ स्मार्टफोनमध्ये ५ इंचाचा डिस्प्ले ज्यातील रिझोल्यूशन 720×1280 पिक्सेल आहे. यात ६४ बिट १.२ गिगाहर्टझ ओक्टाकोर स्नॅपड्रॅगन ६१६ प्रोसेसर आणि २ जीबी रॅम आहे. यात १६ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आलाय. १३ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा फ्रंट ५ मेगापिक्सेल आहे.