नवी दिल्ली : ऑनलाईन अॅपने टॅक्सीची सेवा देणारी कंपनी ओला आता मायक्रो एटीएमची सुविधा देणार आहे. येस बँक आणि ओलामध्ये हा करार झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओला आपल्या टॅक्सी मायक्रो एटीएम लावणार आहे, ज्यामुळे ग्राहकांना 2 हजार रूपये आपल्या कार्डवर काढता येणार आहेत.


ओला आणि येस बँकेने राबवलेली ही कल्पना आता अंतिम टप्प्यात येणार आहे. पुढील 10 दिवसांच्या आत ही सुविधा देशातील 30 ठिकाणी उपलब्ध होणार आहे. कॅब तुमच्याकडे आल्यावर तुम्ही 2 हजार रूपये कॅश मिळवू शकणार आहेत.


ही सुविधा दिल्ली, बंगलोर, चेन्नई, पुणे, कोलकाता, चंडीगड, अहमदाबाद, हैदराबाद आणि जयपूरसह 10 शहरातील 30 ठिकाणी ही सुविधा उपलब्ध असणार आहे.