सत्तांतरानंतर पुन्हा भाजपला खिंडार; आणखी तीन नगरसेवकांच्या हातावर शिवबंधन
जळगाव शहर महानगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर भाजपला पुन्हा धक्का बसन्याची चिन्हे आहेत
वाल्मिक जोशी, जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर भाजपला पुन्हा धक्का बसन्याची चिन्हे आहेत. महापालिकेतील तीन भाजप नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजपाची एक हाती सत्ता असलेल्या व गिरीश महाजन यांचे वर्चस्व असलेल्या जळगाव महानगरपालिकेवर 18 मार्च रोजी भाजपच्या 27 नगरसेवकांचा गट फुटून शिवसेनेत गेल्याने पालिकेवर शिवसेनेने भगवा फडकवला होता.
बहुमतात असलेल्या महापालिकेतील नगरसेवक मोठ्या संख्येने फुटल्याने भाजपनेते आणि माजी मंत्री गिरीष महाजन यांना धक्का असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होती.
पुन्हा पालिकेतील आणखी तीन भाजप नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नगरसेवक शोभा बारी, सुरेश सोनवणे, शेख हसीना बी शेख शफी हे तीनही भाजप नगरसेवक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.
पालिकेतील सत्तांतरानंतर पुन्हा तीन नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याने जळगाव शहर भाजपला पुन्हा धक्का बसल्याच्या राजकीय चर्चा सुरू आहेत.