मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे मुंबई आणि नागपुरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसत असताना, तिकडे नाशिक शहराचीही चिंता वाढली आहे. नाशिकमध्ये दुबई आणि युरोपातील कोरोनाचा नवा स्ट्रेन आल्याची माहिती मिळाली आहे. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेने हे स्पष्ट केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहमीपेक्षा 60 टक्के वेगाने हा नवा कोरोना स्ट्रेन पसरतो. जुलाब होणे, उन्हाळी लागणे किंवा कुठलीच लक्षणे नसणे अशी त्याची लक्षणे आहेत. घरातील अनेकांना एकाचवेळी हा कोरोना संसर्ग होऊ शकतो. स्वॅब टेस्टिंगमध्ये कोरोनाचे काही घटक मिसिंग दिसतात. 


याबाबत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिककरांना सावधगिरीचा इशारा दिलाय. तर दातार जेनेटिक्स या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रयोगशाळेच्या अधीक्षकांनी देखील या नव्या स्ट्रेनबाबतत दुजोरा दिलाय.


राज्याच्या आरोग्य सचिवांनी मात्र हा नवा स्ट्रेन नसल्याचा दावा केलाय. पालकमंत्री आणि आरोग्य सचिव यांच्यात नव्या स्ट्रेनबाबत गोंधळ असला तरी नागरिकांनी मात्र काळजी घ्यायलाच हवी... कारण हा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक आहे...