Nashik Crime News : संशायाचे भूत डोक्यात शिरलं की होत्याचं नव्हत होवून जाते. एका व्यक्तीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून दोन वर्षाच्या लेकराला विहीरीत फेकले आहे.  नाशिक जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्यानेच आपल्या कोवळ्या जीवाला संपवलं आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या नराधम पित्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजेंद्र छबू आपसुंदे असं या विकृत वडिलांचं नाव आहे. दिंडोरी तालुक्यातील कादवा म्हाळुंगी गावातली ही चीड आणणारी घटना आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत त्यानं रागाच्या भरात स्वतःच्या अडीच वर्षाच्या मुलाला विहिरीत फेकून दिलं. दिंडोरी पोलिसांनी त्याला अटक केली. 


पित्याने भयानक कृत्य का केले?


आरोपी सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातूनच दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. याच रागाच्या भरात आरोपीने आपल्या दोन वर्षाच्या बालकाला थेट विहिरीत फेकून देत त्याची हत्या केली आहे.  पत्नीच्या फिर्यादीवरून पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी तात्काळ संशयित पतीला अटक केली आहे.


हा माझा मुलगा नाही


आरोपी चारित्र्याच्या संशयावरुन सतत पत्नीचा मानसिक छळ देखील करत होता. आरोपी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत नेहमी तिच्याशी वाद घालत असायचा. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी वाद घालत असताना आरोपीने धक्कादायक कृत्य केले. हा मुलगा माझा नाही असं म्हणत आरोपीने दोन वर्षाच्या मुलाला उचलून विहीरीत फेकले. आईच्या डोळ्यादेखत तिच्या लहान लेकराचा मृत्यू झाला. या महिलेने थेट पोलिस ठाणे गाठून पतीविरोधात तक्रार दाखल केली. 


पतीने पत्नीला गरम हिटरने चटके दिले


चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला गरम हिटरने चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पुण्यातील कोंढवा भागात ही घटना घडली होती. पीडित महिलेच्या हातात मुलीचा मोबाईल पाहून पतीने तू कोणाबरोबर बोलत तर नाहीस ना म्हणून तिला ओढून बेडरूममध्ये नेलं. ओढणीने तिला बेडला बांधून पतीने तिला गरम हिटरने चटके दिले. पती यावरच थांबला नाही तर त्याने पत्नीच्या डोक्यात, हातापायावर खलबत्त्याने मारहाण केली. यात पत्नी गंभीर जखमी झालीय. पीडितेच्या तक्रारीनंतर 40 वर्षीय पतीला पोलिसांनी अटक केली होती.


पतीवर कुऱ्हाडीनं वार करुन पत्नीनं आत्महत्या केली


पतीवर कुऱ्हाडीनं वार करुन पत्नीनं आत्महत्या केल्याची घटना चंद्रपुरात घडली होती. घुग्गुसजवळच्या नकोडा इथं हा धक्कादायक प्रकार घडलाय. पतीच्या चारित्र्यावर संशय घेऊ पत्नीनं हा हल्ला केला. अर्चना सोयाम असं मयत महिलेचं नाव आहे तर बबन सोयाम असं जखमी व्यक्तीचं नाव आहे. त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.