इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचं आंदोलन
मुंबई : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक झालीय. पूर्व द्रुतगती मार्गावर काँग्रेसने जोरदार आंदोलन केलंय. त्यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालीय. काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली. राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. घोड्यावरून येत आंदोलकांनी आंदोलन सुरू केलंय.
तर जळगावमध्ये पेट्रोल-डिझेल दरवाढीचे पडसाद उमटले. जळगाव जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून दरवाढीविरोधात आंदोलन केलं.
तहसील कार्यालयासमोर झाडाला मोटारसायकली उलट्या टांगून प्रतीकात्मक निषेध आंदोलन करण्यात आलं. झाडाला मोटारसायकली उलट्या लटकावून एक प्रकारे पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाल्यानं आता वाहनांवर आत्महत्या करण्याची वेळ आलीय असं या आंदोलनातून दाखविण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला.