नाशिक : नाशिक महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील नाशिकमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. दरम्यान, राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवं असलेलं नेतृत्व आहे. परंतु ते एकटे महाराष्ट्रात सत्ता स्थापन करू शकत नाही. मनसेने परप्रांतियांबाबतची भूमिका बदलल्याशिवाय त्यांच्यासोबत युती करणं अशक्य आहे. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या नाशिकमध्ये भाजपची एकहाती सत्ता आहे. एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला म्हणून नाशिकची ओळख होती. नंतरच्या काळात कार्यकर्त्यांचे संघटन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. आता पुन्हा राज ठाकरे पक्षाला बळकटी देण्यासाठी ऍक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहेत.


नाशिकमधील पालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजप - मनसेच्या युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिक्रियेनंतर या चर्चांना उधान आले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत 'योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ असं म्हटलं आहे.'


त्यामुळे येत्या दिवसात राज्यात काही वेगळी समिकरणं पाहायला मिळतात का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.