नाशिक: कुत्र्यांच्या बंदोबस्तावरून नाशिकमध्ये नागरिक विरूद्ध मनपा असा वाद रंगला आहे. यावरुन आता नगरसेवक आणि पालिका अधिकाऱ्यांमध्येही खडाजंगी होताना दिसत आहे. पालिकेने शहरातील ७२ हजार कुत्र्यांचे निर्बिजीकरण केल्याचा दावा केला होता. मात्र, गेल्या काही दिवसांत शहरातील अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांकडून सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे पालिकेचा हा दावा पुरता खोटा ठरला आहे.
 


नाशिकमधील इंदिरानगर, नाशिकरोड अशा अनेक परिसरात भटक्या कुत्र्यांकडून हल्ला होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. तर दुसरीकडे भाजपने कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासोबतच उघड्यावर होत असलेल्या मांस विक्रीचा मुद्दाही उचलून धरला आहे. 
 

पालिका अधिकाऱ्यांकडून याबाबत देण्यात येणारी माहिती दिशाभूल करणारी असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. यानंतर अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेशही देण्यात आलेत.