जळगाव : कोरोना काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि मोफत शिक्षण द्यावे, शिक्षकांसाठी ऑनलाईन शिकवण्याच्या पद्धतींचे प्रशिक्षण तसेच पालकांनाही ऑनलाईन शिक्षणाबाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी वॉवेल्स ऑफ द पीपल्स असोशिएशन ही संस्था जळगाव जिल्ह्यात काम करीत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहचवण्यासाठी, तसेच ते पोहचवण्यासाठी शिक्षकांनाही ऑनलाईन शिकवण्याच्या पद्धतींबाबत मार्गदर्शन ही संस्था करीत आहे. 


या संस्थेची टीम ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षणासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देणे, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील तज्ज्ञ शिक्षकांची मदत घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील स्थानिक भाषांचा वापर शिक्षणासाठी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना अहिराणी, मराठी, ऊर्दू भाषेतूनही कन्टेंट देण्यात येत आहे.


विद्यार्थ्यांसाठीच्या ऑनलाईन शिक्षणाच्या प्लॅटफार्मवर फक्त व्हिडिओचा भडिमार नसून, वर्कशिट, पीपीटी, गुगल फॉर्म अशा वेगवेगळ्या शिकण्याच्या पद्धतींचा सामावेश करण्यात आला आहे.अशी माहिती संस्थेच्या संचालिका ऋतुजा सीमा महेंद्र यांनी दिली आहे.


संस्थेच्या माध्यमातून 628 शिक्षकांचे प्रशिक्षण तीन दिवस टप्प्या टप्प्यात घेण्यात येत आहे.  यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांचे मार्गदर्शन संस्थेला लाभत आहे.