इटली : इटलीमध्ये (Italy) पुन्हा एकदा कोरोनाने (Corona) डोकं वर काढलं आहे. मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांचं निदान होत आहे. आरोग्य तज्ज्ञांनुसार, अचानक वाढणाऱ्या रुग्णसंख्येला यूरोपीय चॅम्पीयनशीप जिंकल्यानंतर (Euro Cup) करण्यात आलेलं जंगी सेलिब्रेशन कारणीभूत आहे. इटलीने 12 जुलैला यूरो कप जिंकला. या विजयानंतर संपूर्ण देशात जोरदार जंगी सेलिब्रेशन केलं गेलं. विजयाच्या आनंदात इटलीतील नागरिकांच्या आनंदाचा पारवा उरला नाही. त्यांनी रस्त्यावर येत सेलिब्रेशन केलं. तसेच विजयी संघाच्या स्वागतासाठी मोठी रॅलीही काढण्यात आली.  या सेलिब्रेशनदरम्यान कोरोनाच्या नियमांना फाटा देण्यात आला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून इटलीत कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. (Celebrations of Euro Cup 2021 spoiled the situation in Italy Daily Cases of Covid increased almost 4 times)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ


या विजयी जल्लोषाला आता आठवडा झाला आहे. यानंतर याचा परिणाम आता दिसू लागलाय. रोम, लाजियो, मिलान आणि अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. शनिवारी लाजिओत सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली. वृत्तांनुसार, 1 जुलैला इटलीत 879 रुग्ण आढळले होते. तर तीच आकडेवारी 18 जुलैला हजार 127 रुग्ण सापडले. एकूणच कोरोनाचा विस्फोट झाला.  


कोरोना नियमांची ऐशीतैशी


मोठ्या उत्साहात खेळाडूंचं ओपन बसमधून रॅली काढण्यात आली.  या बसला अनेक जण आपल्या वाहनांनी तसेच पायी फॉलो करत होते. या दरम्यान सामाजिक अंतराचा अनेकांना विसर पडला. या रॅलीमुळेच आता इटलीत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या आढळत आहेत. त्यामुळे आता इटलीला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचंही म्हटलं जातंय.